Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 02, डिसेंबर :- मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी हे केंद्र, राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आहे. येथे सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण 6 महिन्यांच्या कालावधीचे असुन सदर प्रशिक्षण वर्ग दि.01/01/2023 ते दि.30/06/2023 पर्यंत आहे. अर्जाचे नमुने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, सातपाटी यांच्या कार्यालयातुन कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळुन घेऊन जावेत. परिपूर्ण अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि.30/12/2022 राहील. या प्रशिक्षण वर्गासाठी 22 विद्यार्थी घेण्यात येणार आहेत.

दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना रु.100/- प्रतिमहा तर दारिद्ररेषेवरील विद्यार्थ्यांना रु.450/- प्रतिमहा प्रशिक्षण फि आकारण्यात येते.
या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पात्रता पुढील प्रमाणे असावी.उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे, उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे, उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे, उमेदवार क्रियाशिल मच्छिमार असावा, उमेदवारास किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर उमेदवारास रोजगार व स्वयंरोजगाराच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध होतात. तरी आपणांस विनंती करण्यात येते की, पालघर जिल्हयातील जास्त खपाच्या वर्तमानपत्रात या प्रशिक्षणासाठी बातमी दयावी जेणे करुन जिल्हयातील जास्तीत जास्त युवकांना याबद्दल माहीती अवगत होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रवेश अर्ज आदींबाबत माहीतीसाठी या केंद्राचे .ज्ञानेश्वर पां.भोसले, यांत्रिकी निर्देशक, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी यांच्यांशी मोबाईल क्र.8624919113 वर संपर्क साधावा. असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी आनंद पालव यांनी केले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मच्छिमार युवकांनसाठी प्रशिक्षण

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.