Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बसफेऱ्या नसल्याने विदयार्थ्यांना करावी लागते 3 ते 4 तास बसची प्रतीक्षा..

माजी आमदार दीपक आत्राम यांनी आगार प्रमुखासोबत बसफेऱ्या वाढविण्या संदर्भात चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मूलचेरा 1 ऑक्टोबर :-  मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथे शाळा व कॉलेजमध्ये आजूबाजुच्या गावांतुन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेज सुटल्यानंतर बस च्या प्रतीक्षेत गावी जाण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास वाट पाहत उभे राहावे लागण्याचे भीषण वास्तव सामोरे येत आहे. माजी आ.दीपक आत्राम हे गडचिरोली वरून आल्लापल्ली परतताना त्यांना आज(शनिवारी) दुपारी सुंदरनगर येथील बाजार चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एका दुकानासमोर उभे दिसले या बाबत आत्राम यांनी विध्यार्थ्यांकडे या बाबत चौकशी केली असता आमची शाळा/कॉलेज 12 वाजताच सुटले मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत बस न आल्याने आम्ही आमच्या गावी जाण्यासाठी बसची वाट बघत उभे आहो असे सांगितले.


विद्यार्थी वर्गाची अडचण लक्षात घेता माजी आ.दीपक आत्राम यांनी तात्काळ अहेरी येथील एस .टी महामंडळाचे आगार प्रमुख युवराज राठोड, गडचिरोली येथील विभाग नियंत्रक वाडीभस्मे यांना फोन लावून याबाबत कळविले व या मार्गावर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. सोबतच अहेरी येथील आगारात येऊन आगार प्रमुखासोबत चर्चा केली.चर्चेअंती या मार्गावर विध्यार्थ्यांसाठी शाळा सुटण्याअगोदर 1 तास आधी अहेरी येथून एक बस पाठविण्याचे आश्वासन आगार प्रमुख युवराज राठोड यांनी माजी आ.दीपक आत्राम यांना दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माजी आमदार दीपक आत्राम यांच्या प्रयत्ना मुळे विध्यार्थी वर्गाची होणारी गैरसोय टळणार आहे. यावेळी चर्चेवेळी सोबत माजी जि प सदस्य संजय चरडुके, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, विनोद कावेरी, सतीश पोरतेट, विनोद मडावी, नदीम सय्यद, मिलिंद अलोने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.