Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आत्ता आश्रम शाळेतील विद्यार्थी होणार स्मार्ट; शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वाटप

धर्मरावबाबा आत्राम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 15 ऑगस्ट 2023 : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्यां वर्धापन दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार धर्मराव बाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त यांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात ,निवासी शाळेत शिकणारे विद्यार्थी कुमारी पुष्पा जाडी, कुमारी अक्षता मेश्राम, मोहन चांदेकर यांचा MBBS ला प्रवेश झाल्याबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र, टॅब देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील 11 आश्रम शाळेतील सर्व मोफत टॅब देण्यात आले.त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात आज वाटप करण्यात आले. यापुढे आश्रम शाळेतील विद्यार्थी टॅब वर शिक्षण घेणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कॉन्व्हेन्ट चे तुलनेत निवासी शाळेची सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यात आले आहे.यापुढे कॉन्व्हेन्ट पेक्षा चांगला निकाल शाळेने द्यावा,त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मा. मंत्री महोदयांनी दिले. यावेळी मंत्री महोदयांच्या सत्कार विभागाच्या वतीने श्री. देवसुदन धारगावे ,उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त यांनी केले.यावेळी किन्नाके मॅडम पोलिस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण चे सर्व कर्मचारी , समाज कार्य महाविद्यालय येथील सर्व कर्मचारी ,लायब्ररी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.