Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बाल विवाह मुक्त व्हावा यासाठी जनजागृती रैली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, 12 एप्रिल : देशामध्ये विविध ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात काही समुदायांमध्ये बालविवाहाची प्रथा आहे. वर्षातील काही विशिष्ट कालावधीत समर्पित पद्धतीने ही प्रथा पाडली जाते. भारतात अक्षय तृतीयेच्या काळात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे आढळून आले आहे. 22 एप्रिलला यंदा अक्षय तृतीया हा सण साजरा करण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा बाल विवाह मुक्त व्हावा या उद्देशाने जनजागृती करण्यात यावी यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नागपूरच्या वतीने जनजागृती रैली काढन्यात आली असून या रैलीला नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. नागपुरातील व्हेरायटी चौक ते संविधान चौक पर्यंत ही रैली काढण्यात आलेली होती. या रॅलीमध्ये सर्व विविध सामाजिक क्षेत्रातील संघटना, कार्यक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.