लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 31 ऑक्टोबर :- सध्याच्या डिजीटल युगात डेटाला खुप महत्व आहे. बॅंक खातेधारकांचा डेटा धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. बॅंक खातेधारकांच्या डेटाबाबत ही अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. मात्र डेटा लिंक होण कस शक्य आहे असे वाटत असेल पण हे खर आहे. फक्त एसबीआय आणि इतर 17 बॅकेतील खातेधारकांचा डेटा धोक्यात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही काही पहिली वेळ नाही. याआधीही 2016 मध्ये Drinik Android मेलवेयरचा धोका होता. तेव्हा हा मेलवेयर बॅंकिंग क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरला होता. तेव्हा या मेलवेयरच्या मदतीने एमएमएस चोरी केले जायचे. मात्र आता हा मेलवेयर आणखी धोकादायक ठरतोय. आता या मेलवेयरच्या मदतीने स्क्रीन रेकाॅर्डिंग, की लाॅगिंग, एक्सेसबिलीटीचा दुरूपयोग केला जात आहे.
रिपोर्ट नुसार, Drinik Android च लेटेस्ट व्हर्जन iAssist च्या स्वरूपात आले आहे. ही एक एपीके फाईल आहे. जर हे तुमच्या डिव्हाईसमध्ये इंस्टाॅल झाले तर एपीके फाईल युझर्सचे काॅल हिस्ट्री जाणून घेण्यासाठी त्याबाबत परवानगी मागतात. इतर बॅंकिंग ट्रोजनप्रमाणे Drinik Android एक्सेसिसिबिलीटी सर्व्हरवर आधारित आहे. डिव्हाईसमध्ये सर्व आवश्यक एक्सेस मिळाल्यानंतर गूगल प्ले प्रोटेक्टला डिसेबल करते. त्यानंतर ऑटो-जेस्चरला एग्जीक्यूट करतो आणि प्रेसल कॅप्चर करतो.
या प्रकारची फिशिंग वेबसाईटपासूनचा धोका टाळायचा असेल तर चुकीच्या वेबसाईटवर जाउ नका. तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. असे करणे धोकादायक ठरू शकते. जो पर्यंत पूर्णपणू खात्री करत नाही तो पर्यंत कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सोबतच विनाकारण कोणत्याही वेबसाईटवर जाउ नका आणि महत्वाचे म्हणजे कोणत्याही लोभात पडू नका.
हे देखील वाचा :-
Comments are closed.