Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड महावितरण उपविभागातर्फे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” बाईक रॅली काढून साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भामरागड, दि. १३ ऑगस्ट: महावितरण भामरागड उपविभाग मार्फत आज दिनांक 13/08/2022 रोजी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” तसेच “हर घर तिरंगा” निमित्त शहरातून बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

या रॅलीमध्ये “हर घर तिरंगा” उपक्रमासह महावितरण कार्यालयातर्फे सामान्य जनतेला वीज जोडणीची अर्थिंग व्यवस्थित ठेवणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, विजेचा वापर काळजीपूर्वक करून अपव्यय टाळणे, विद्युत अपघात टाळणे, तसेच विजेचे बिल वेळेवर भरणे इत्यादी संदेश देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या रॅलीस भामरागड नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सूरज जाधव साहेब यांनी उपस्थित राहून हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

रॅली महावितरण उपविभाग कार्यालय भामरागड येथून निघाली आणि लोकबिरादरी हेमलकसा, आंबेडकर वॉर्ड, प्रकल्प कार्यालय, पोलीस स्टेशन, बस स्टँड मार्गावरून हेमलकसा येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या रॅलीमध्ये उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, कनिष्ठ अभियंता पंकज तेली, कनिष्ठ सहायक प्रफुल्ल वासनिक, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र दाढे, राजू महाका, शशिकांत ढोले, नितेश श्रीरामे तसेच सर्व जनमित्र व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Comments are closed.