Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धनंजय मुंडे ची बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाजी, पंकजा मुंडेंना मोठा धक्का!

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालामुळे पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसला आहे. 

अपक्ष उमेदवाराचा महाविकास आघाडी च्या उमेदवाराला धक्का

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीड, दि. २१ मार्च: मुंडे-बहीण भावाच्या आरोप प्रत्यारोपामुळे बहू चर्चित बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत भाजपा ने बहिष्कार टाकल्या नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. आज या निवडणुकीची मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पैंनल विजयी झाले आहे. यात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आठ पैकी सहा जागेवर विजय मिळवला आहे. हा पंकजा मुंडे ना धक्का समजला जात आहे. तसेच या निवडणुकीत काँगेस चे अपक्ष उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांनी महाविकास आघाडीला धक्का देत विजयी झाले आहेत.

बीड जिल्हा बँकेच्या आठ जागेसाठी काल मतदान झाले होते. ५८ टक्के मतदान झाले तर मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळ झाला होता. बोगस मतदान झाल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. तसेच या कारणावरुन परळीत भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानमध्ये भांडण देखील झाले होते. या पार्श्वभूमीवर आज मतमोजणीला सकाळी ९ वाजेपासून बीड जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात सुरुवात झाली. यात ८ जागे पैकी ६ जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१) इतर शेती संस्था मतदार संघ अमोल आंधळे-२२३ मते २१२ मतांनी विजयी धनराज राजभाऊं मुंडे यांना – ८ मते

२) कृषी प्रक्रिया मतदार भाऊसाहेब नाटकर – ४२ मते ४१ मतांनी विजयी

३) पतसंस्था मतदार संघ- राजकिशोर पापा मोदी ९३ मते घेऊन विजयी. गंगाधर आगे यांना ३६ मते पडली

४)जिल्हा बँकेच्या ओबीसी मतदार संघातुन-कल्याण आखाडे – ७१६ मते घेऊन विजयी

५) अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात रवींद्र दळवी ७२० मते घेऊन विजयी, एकूण मते ८०५  

६) जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदारसंघात सौ सुशीला शिवाजी पवार यांना २३४ घेऊन विजयी

७) सौ कल्पना दिलीप शेळके यांचा १७४ मते घेऊन उमेदवार विजय,

८) परळी येथील सौ प्रयागाबाई साबळे यांना केवळ ११८ मते, बाद मतांची संख्या विजयी उमेदवार यांना पडलेल्या मतांपेक्षा अधिक आहे

९) जिल्हा बँक विमुक्त जाती जमातीमतदार संघ – सूर्यभान मुंडे विजयी

महाविकास आघाडी शेतकरी विकास पैंनल- ०५

सुरेश धस गट भाजपा – ०१

शिवसेना क्षीरसागर गट – ०१ अपक्ष- ०१

Comments are closed.