Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी- गडचिरोली पोलीस दलाची मोठी कार्यवाही 150 किलो गांजा सह दोन आरोपी अटक

असरअल्ली पोलीस यांची मोठी कारवाई एकुण २०,००,०००/- रु. किमतीच्या मुद्देमाल जप्त.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली / असरअल्ली, 23 जुलै – असरअल्ली पोलीस स्टेशन सपोनि राजेश गावडे, यांना छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) असरअल्ली कडे येत असल्याची गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन असरअल्ली हद्दीतील असरअल्ली ते पातागुडम रोडवरील फॅरिस्ट नाक्याजवळ सापळा लावला.

सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन न थांबविता सदरचे वाहन हे रोडच्या खाली उतरवून वाहनातील एक महिला व एक पुरुष यांनी पळ काढला असता, पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने एक महिला व एक परुष यांना पकडले. त्यानंतर सदर कारची पाहणी केली असता, कारच्या मागील डिक्कीमध्ये ३६ लहान बॉक्स मिळून आल्याने सदर बॉक्समध्ये अंदाजे १५० किलो अमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १५,००,०००/- (अक्षरी पंधरा लाख रुपये) व सदर गुन्ह्यात यापरलेली चारचाकी वाहन ( रेनॉल्ट डस्टर) क्र. एम एच ३४ ए एम ५५०१ अंदाजे किंमत ५,००,०००/- (अक्षरी पाच लाख रुपये) असा एकूण अंदाजे किंमत २०,००,०००/- (अक्षरी बीस लाख रुपये) चा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन असरअल्ली येथे आणून आरोपी नामे १) शिव विलास नामदेव व २) ज्योती सत्येंद्र वर्मा, दोन्ही रा. उत्तरप्रदेश यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात अवैध अमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नीलोयल  यांनी कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व अधिकारी यांना दिले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंताअपर पोलीस अधीक्षक, अहेरी  यतिश देशमुख तसेच  उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा  सुहास शिंदे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे यांचे नेतृत्वात पोअं/ जगन्नाथ कारभारी, पोअं/ दिलीप उईके, पोअं/ शंकर सलगर, पोअं/ आदिनाथ फड यांनी पार पाडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.