Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू, नागरिकांची आरोग्य तपासणी करणं आरोग्यासाठी गरजेचं – आरोग्य मंत्री राजेश टोपे

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ११ जानेवारी: परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून अशा प्रकारची तपासणी गरजेचं असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

आज परभणीमध्ये एका गावात निश्चीत प्रकारे बर्ड फ्लू संदर्भात बातमी आहे व ती खरी असून या अनुषंगाने पक्ष्यांच्या लाळेतून माणसाकडे पण जाऊ शकतो पण त्याची शक्यता कमी असते ते काही चिकन खाल्ल्याने जाते असे नाही पण हे चिकन शिजवलेले तर त्याने प्रसरित होत नाही परंतु न शिजवलेले  असेल किंवा चुकीच्या पद्धतीने शिजवले असेल तर मग मनुष्याला सुद्धा होऊ शकतो पण मनुष्याला होण्याचं प्रमाण कमी असून नक्कीच पक्ष्यांना तो जास्त होतो कोंबड्यांना जास्त होतो,आणि त्यातून मृत्यू होण्याचं प्रमाण नक्कीच मोठं आहे,त्यामुळे बर्ड फ्लू च्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाने हातात हात घालून काम करणं आवश्यक आहे,त्या पद्धतीने कॅबिनेट मध्ये चर्चा झाली असून आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग जिथे अश्या पद्धतीची लक्षणे दिसत आहेत त्याठिकाणी चांगले समन्वय करून त्याठिकाणी काम करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती पावले उचलली असून चिंता आणि काळजी करण्याचा विषय नसून आपण जागरूक आहोत आणि आपण लक्ष ठेऊन आहोत, ज्यागोष्टी करायच्या त्यागोष्टी आपण करत असून काळजी करण्याचा विषय नाही पण जागृत राहावे असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे आज जालन्यात म्हणाले. मत्स्योदारी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमास ते आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Comments are closed.