Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टाटा इन्स्टिट्यूट च्यावतीने सामूहिक वन हक्क संसाधन व्यवस्थापन आराखडा तयार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, 11नोव्हेंबर :- जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय,चंद्रपूर, जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई च्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्ह्यातील आठ तालुक्यात सामूहिक वन हक्क प्राप्त गावाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

दिनांक १० /११/२०२२ रोजी, मौजा महापांढरवानी ग्रा. प. येरमीयेसापुर, ता.जिवती येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६. नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार कलम ५ आणि कलम ३(१)(झ) नुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन निवासी यांना “निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन स्त्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क” प्रदान करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र शासन निर्णय ६ जुलै २०१७ च्या अनुषंगाने सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला अनुसूचित जमातीचे वन निवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांच्या फायद्यासाठी अशा सामूहिक वन संपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन, संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी वन विभागाच्या सूक्ष्म योजना किंवा चालू योजना , व्यवस्थापन योजना बरोबर फेरबदलानिशी एकत्रीकरण करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहे. त्याच संदर्भाने या बैठकीत व्यवस्थापन आराखड्या विषयी चर्चा करण्यात आली.

या बैठकीत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते संतोष सलाम तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई चे संशोधन अधिकारी अमोल कुकडे ,जगदिश डोळसकर, डॉ.नीतिन गनोरकर, नेहुल गोयल उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

 

Comments are closed.