Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय पँथर्स आघाडी, स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सफाले येथे संविधान दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सफाले 30 नोव्हेंबर :-  राष्ट्रीय पँथर्स आघाडी व स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागर संविधानाचा हा कार्यक्रम देवभूमी हॉल , मौजे सफाले येथे शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात भारतीय संविधान दिनाच्या जयघोषाने भव्य दिव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येऊन विविध शासकीय कार्यालयांना भेट देण्यात येऊन भारतीय संविधान व महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. तर दुसऱ्या सत्रात सामूहिक भोजन व जागर संविधानाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यात आला. राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सर्वासर्वे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समतासमूल समाज घडवण्यासाठी बहुजन समाजात अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत आपल्या देशाच्या संविधानाचा प्रसार तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय व्यवस्था आणि संविधानातील मूलभूत अधिकार तसेच नागरिकांचे कर्तव्य यांची जाणीव जनतेला करून द्यावी लागेल. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जागर संविधानाचा या चळवळीचे महाराष्ट्र राज्य समन्वय संजीवजी कसबे साहेब यांनी भारतीय संविधान, संविधानातील मूल्य, तत्वे, मूलभूत अधिकार याची जाणीव प्रत्येक नागरिकांना होणे अपेक्षित असून, देशातील प्रत्येक नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून संविधान आणि संविधानातील मूलभूत अधिकार , हक्क , कर्तव्य याची जाणीव समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे प्रामाणिक काम कारण्यासंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेश म्हात्रे , उंबरपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच तनुजाताई कवली , संघर्ष संघटनेच्या सुमनताई मानकर, सामाजिक कार्यकर्ते कुणाल भोईर, संजय भोईर, राष्ट्रीय पँथर्स आघाडी महाराष्ट्र कार्यकारिणीचे उपाध्यक्ष राहुल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष तथा अध्यक्ष आदिवासी विभाग महाराष्ट्र कमलाकर माळी, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तथा मुंबई प्रदेश सचिव योगेश कांबळे, पालघर जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव, महिला जिल्हा अध्यक्षा विद्याताई मोरे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष योगेश राऊत, संविधान सामाजिक संघटना अरविंद गमरे तसेच राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते बिंबेश जाधव, अरशद खान, भरत महाले, भावेश दिवेकर, मोहिनी जाधव, रोहित चौधरी, अजिंक्य म्हस्के, स्नेहाताई जाधव, राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोषजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र मोरे, जिल्हा सचिव रमाकांत गायकवाड, महिला आघाडी जिल्हा महासचिव सुमती कांबळे, जिल्हा प्रमुख सल्लागार उमेश कापसे, चंद्रसेन ठाकूर, अहमद खान, दिवाकर जाधव, पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, डहाणू तालुका अध्यक्ष जीभाऊ अहिरे, जव्हार तालुका अध्यक्ष देविदास दिघा, पालघर जिल्हा युवाध्यक्ष हितेश कुर्ले,पालघर जिल्हा युवा उपाध्यक्ष विशाल मोहणे, रामदास जंगली, डहाणू तालुका उपाध्यक्ष सिराज शेख, डहाणू तालुका महिला अध्यक्ष वहिदाताई शेख, डहाणू तालुका महिला उपाध्यक्ष शितलताई ठाकरे, पालघर तालुका सहसचिव सुचिता कांबळे, सफाले विभाग अध्यक्ष विंदेश कापसे, सफाले शहर अध्यक्ष गोविंदा बोराडे, सफाले शहर उपाध्यक्ष विजय कांबळे, प्रमुख सल्लागार सदाशिव मोरे, वरिष्ठ कार्यकारणी अशोक निकम ,वरिष्ठ कार्यकारणी सुदाम सर्जेराव, सफाले शहर सहसचिव पॅंथर अंजना गायकवाड, शहर उपाध्यक्ष पुनम बोराडे, विभाग उपाध्यक्ष पॅंथर वसंत बोराडे, सफाळे विभाग युवा संघटक आकाश गायकवाड, सफाळे विभाग युवती संघटक जाई कांबळे, सफाळे विभाग युवती संघटक उत्कर्षा गायकवाड, सफाळे विभाग कार्यकारणी प्रशांत जाधव, अमर कोरी. वानगाव शहर महिला सचिव सोनाली ताई जाधव तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोषजी कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवयित्री , शिक्षिका स्वातीताई भोईर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी वहिदाताई शेख , डहाणू तालुका महिला अध्यक्ष नौसीन शेख , डहाणू तालुका उपकार्याध्यक्ष रुपेश सुकूर बारी, डहाणूखाडी विभाग महिला अध्यक्ष संगीताताई बारी, तारापूर विभाग अध्यक्ष आबीद शेख यांच्या वरील पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. व कार्यक्रमाच्या शेवटी सफाले विभाग अध्यक्ष विंदेश कापसे यांनी उपस्थित पाहुण्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यकर्माची सांगता करण्यात आली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.