Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनोरंजक लघु चित्रपटातून पटवून दिले व्यसनाचे दुष्परिणाम

व्हिडिओ व्हॅनने वेधले विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे लक्ष

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31 जुलै : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण , दुर्गम व अतिदुर्गम गावातील नागरिकांना दारू व तंबाखूचे दुष्परिणाम समजावे. ज्यांना या पदार्थाचे व्यसन नाही त्यांनी त्याच्या आहारी जाऊ नये.  ज्यांना व्यसन आहे त्यांनी स्वत: किंवा गरजेनुसार मुक्तिपथ क्लिनिक मध्ये उपचार घेऊन व्यसन सोडावे. या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे  व्हिडिओ व्हॅन चित्ररथ द्वारा शाळेत, गावात, बाजारात जागृती सुरु आहे. याच अनुषगाने नुकतेच मूलचेरा तालुक्यातील तालुका मुख्यालयासह विविध शाळा व  गावांमध्ये व्हिडीओ वॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

मूलचेरा तालुक्यातील जिप शाळा येल्ला, भगवंतराव हायस्कूल गोमणी, भगवंतराव आश्रमशाळा गोमणी, शासकीय आश्रमशाळा मूलचेरा, भगवंतराव आश्रमशाळा मूलचेरा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लोहारा, जिप शाळा कालीनगर, राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल, जिप शाळा अडपल्ली चेक, जिप शाळा लगाम, शहिद बिरसा मुंडा आश्रमशाळा लगाम, नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल सुंदरनगर, जिप शाळा विजयनगर, जिप शाळा लक्ष्मीपुर, जिप शाळा मोहूर्ली, जिप शाळा श्रीनगर, जिप शाळा मूलचेरा या शाळांसह मूलचेरा शहर व येल्ला, देशबंधुग्राम, मल्लेरा, बंदूकपल्ली, रेंगेवाही, भगतनगर, गांधीनगर, लक्ष्मीपूर, कालिनगर या गावांमध्ये व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून व्यसन म्हणजे काय, व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसन उपचार आदी बाबत माहिती देण्यात आली. या व्हॅनच्या माध्यमातून ‘यमराजाचा फास, शाब्बास रे गण्या,  व्यसन उपचार शिबीर’ याबद्दलचे लघुचित्रपट दाखविण्यात आले.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.