Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बीड पोलीस दलसाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड : येथिल पोलीस मुख्यालय या ठिकाणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड पोलीस दलास दुचाकी व चार चाकी गाड्या वितरित करण्यात आल्या.

या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्या जीवनातले हे पाहिले महत्वाचे काम असून माझ्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम आहे मात्र वाहनानेही संपन्न असण्यासाठी पोलीस दलाला वाहनांची साधनांची कमतरता नसावी यासाठी बीड जिल्हा नियोजन समिती मार्फत 151 दुचाकी व 8 स्कॉर्पिओ तसेच डायल 112 या 4 चाकी 4 गाड्या आज देण्यात आल्या. यामुळे पोलीस यंत्रणेला नक्कीच तपासात गती मिळेल अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महिलांच्या सुरक्षेसाठी 6 गाड्या तर पिंक मोबाईल ही नवीन संकल्पना देखील जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचे एस पी आर राजा यांनी म्हटले आहे.

यासोबत पहिल्यांदाच महिला बिट अंमलदार हे सुद्धा महिलानसाठी ही संधी दिली आहे
नक्कीच जिल्ह्यातील गुन्हेगारी ही कमी होईल तसेच हुन्हेगारात वचक ही वाढेल असे ते म्हणाले यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप,जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,सह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

खा. नवनीत राणा यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील… संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर 

राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे – माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

 

 

Comments are closed.