Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र गुजरात पेक्षा मागे पडल्याची देवेंद्र फडणवीस यांना खंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 16 सप्टेंबर :- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील पुण्याहून गुजरातला हलवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे दावे खोडून काढत महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडल्याची खंत व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले की, गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा मोठा आहे. मात्र आपल्याकडे रिफायनरीलाच विरोध करण्यात आला. मी अनिल अग्रवाल यांच्याशी बोललो होतो. गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज करतो म्हटलं. त्यावर ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात नक्कीच गुंतवणूक करू, पण आता आमचा निर्णय़ झालेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुजरात पेक्षा मागे पडला. पण पुढील २ वर्षात महाराष्ट्राला निश्चित पुढे नेणार ! असेही ते म्हणाले. सर्व जिल्ह्यांच्या अडचणी सोडवून महाराष्ट्राला सक्षम करणार. भारत ५ ट्रेलियन करण्यासाठी महाराष्ट्राला वन ट्रेलियन करू. असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.