Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

यूकाँच्या उपाध्यक्षपदी धोंडणे तर कोषाध्यक्षपदी चंडीकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

देसाईगंज:- तालुका युवक कॉंग्रेसने तालुक्यात कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात आला. त्यामध्ये तालुक्यातील विविध गावातील समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या युवकांची पक्षात निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तर नुकतेच पुन्हा युवक काँग्रेस तर्फे शंकरपुर येथील सामाजिक कर्यकर्ते जयपाल धोंडणे यांची निवड करून त्यांना तालुका युवक काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. तर कोषाध्यक्षपदावर गांधीनगर येथील विनोद चंडीकार, तालुका सरचिटणीस पदावर गांधीनगर येथील प्रशांत मैंद यांची निवड करून त्यांना पक्षाची ध्येय धोरणासंदर्भात मार्गदर्शन करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सदर नियुक्ती तालुका युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष पंकज चहांदे यांनी, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्र गजपुरे यांच्या मार्गदर्शनात केली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीचे श्रेय युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष लारेन्स गेडाम, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आ. आनंदराव गेडाम, युकाँ. विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते, शहराध्यक्ष विक्की डांगे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन राऊत, संजय करांकर, कॉंग्रेस कमिटीचे सचिव जगदिश शेंद्रे, माजी नगरसेवक गणेश फाफट, हरिश मोटवाणी, आरिफभाई खानानी, किसान सेल तालुकाध्यक्ष अभय नाकाडे, निरिक्षक टिकाराम साहारे, रोशन मेश्राम उपाध्यक्ष सेवादल, आदींना दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमर भर्रे, मच्छिंद्र मातेरे, देवनाथ सयाम, सचिव आक्रोश शेंडे, महासचिव महेश चंडीकार, अमर बगमारे, संजय कुकुडकार, नेताजी बुराडे, सहसचिव लालाजी दोनाडकर, धनपाल गणवीर, अंकीत मेश्राम, तालुका सरचिटणीस अमोल सोनपीपरे, अक्षय दामले, यादव पारधी, अरविंद दुपारे, अविनाश अनोले, चांद बनसोड, आदींनी नियुक्ती पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे.नुकतेच तालुका युवक काँग्रेस तर्फे कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर पुन्हा लवकरच तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात ”युवक काँग्रेस आपल्या दारी” हा उपक्रम राबवून त्या माध्यमातून नागरिकांना मोफत श्रम कार्ड व आभा कार्ड, वितरित करण्यात येणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.