Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेझींग डे निमीत गडचिरोली पोलीस दलाकडून दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप

१७८ युडीआयडी व १५८ बस सवलत कार्डचे वाटप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली : जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे नक्षल प्रभावित भागात अतिदुर्लक्षीत असलेल्या दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र काढुन देऊन त्यांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग, गडचिरोली यांच्या सहकार्याने पोस्टे / उपपोस्टे/ पोमकें हद्दीतील दिव्यांगाची नोंदणी करुन ऑनलाईन प्रक्रिया करुन १७८ दिव्यांग व्यक्तींचे अपंगत्व आयडी कार्ड व १५८ नागरिकांचे बस सवलत कार्ड काढुन देण्यात आले.

दिनांक ०२/०१/२०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमीत्त (रेझींग डे) सदर दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्ड वाटप कार्यक्रम पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पडला.या कार्यक्रमात पोमकें पोटेगाव हद्दीतील दिव्यांग नागरिक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित करतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. पोलीस नेहमी दिव्यांग बांधवांचा आधार असेल व आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करु.

आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन दिव्यांगासाठी एकुण ०३ आरोग्य शिबीर राबविण्यात आलेले असून, त्यामध्ये १३८७ दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र, ९८८ दिव्यांगाना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, ८५० दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना, ४१० दिव्यांग नागरीकांना साहीत्य वाटप, ४११ दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय इत्यादी साहीत्य वाटप करण्यात आलेले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी)  यतिश देशमुख हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोरटे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, समाज कल्याण कार्यालय, गडचिरोली, जिल्हा परिषद, गडचिरोली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोलीच्या टीमने अथक परिश्रम घेतले.

 

Comments are closed.