Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात

बस दुचाकीला धड़कली : दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक, 11 मार्च :-नाशिक परिसरात पुन्हा एक भीषण अपघात  झाला असून खासगी बसच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवदर्शनाहून परतताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, खासगी वाहतूक करणारी बस (MH 47 AS 4848) प्रवाशांनी भरलेली होती. त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून निघाल्यानंतर नाशिककडे मार्गक्रमण करीत होती. अशातच बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुल जवळ आली असता टायर फुटले, बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली. यामुळे नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक देत झाडावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दुचाकीवरील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.