Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेपनपल्ली उपपोलीस स्टेशन व सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला आर्थिक मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : रेपनपल्ली उपपोलीस स्टेशन व सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने गंभीर आजारी असलेल्या मनोज दागम या रुग्णाला आर्थिक मदत करण्यात आली.

मनोज रमेश दागम सदर व्यक्ती मोयाबीनपेठा येथील मूळ रहीवासी आहे मनोज चे रेपनपल्ली येथे सलूनचे दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने त्याचे दुकान बंद होते. त्यातच मनोज हा एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या मनोज ला नागपूर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मनोज च्या घरची परिस्थिती बिकट असल्याने दवाखान्याचा खर्च कसा करायचा हा प्रश्न उभा राहीला. त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांच्या परिवार मदतीची प्रतीक्षेत आहे. ही माहिती मिळताच रेपणपल्ली चे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके यांना मिळताच त्यांच्या पुढाकाराने उपपोलीस स्टेशन रेपनपल्ली तर्फे १६ हजार रुपये ची आर्थिक मदत रेपनपल्ली गावकऱ्यांनी व पत्रकार सतीश दैदावार यांच्या पुढाकाराने ३००० हजार रुपये अशी १९ हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा करून मनोज च्या परिवारांना स्वाधीन केली.

मनोज च्या परिवाराकडून रेपणपल्ली उपपोलिस स्टेशन व सामाजिक कार्यकर्त्याचे आभार मानले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडुन ४ गुन्हयातील जप्त ३२ किलो गांजा करण्यात आला जाळून नष्ट

अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक 

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

 

Comments are closed.