Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंडारा विश्रामगृहातील तो मांसाहाराचा बेत कुणासाठी?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भंडारा, दि. १२ जानेवारी: सामान्य रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर मंत्री आणि अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातली रेलचेल वाढली. सहाजिकच विश्रामगृहातील वर्दळ वाढून भोजनावळी सुरू झाल्या. नेते, अधिकारी येणार असल्याने हे होणे अपेक्षित आहे. परंतु सोमवारी या विश्रामगृहात झालेली मांसाहाराची मेजवानी चर्चेचा विषय ठरली आहे. कुणासाठी आणि कुणाकडून हा बेत आखला गेला हे स्पष्ट नसले तरी त्यादिवशी जिल्ह्यात केवळ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री येऊन गेल्या हे उघड आहे. मंत्री महोदय यांचे भोजन अन्यत्र झाले, मग हा बेत कुणासाठी हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे.

आठ जानेवारीच्या घटनेनंतर जिल्ह्यात सतत नेते आणि अधिकाऱ्यांची वर्दळ आहे.सामान्य रुग्णालयाला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर त्याने ते विश्रामगृहात विसावतात. यापैकी काहीनी विश्रामगृहात भोजन घेतले तर काही नाही ते टाळले. भोजन घेणे यात काहीच वावगे नाही. मात्र जिल्ह्यातली परिस्थिती आणि ओढवलेला प्रसंग पहाता भोजनाचा वेगळ्या तर बेत आखला जात असेल तर हे मात्र नक्कीच लाजिरवाणी आहे. सोमवारी 11 जानेवारीला असाच मांसाहारी भोजनाचा बेत विश्रामगृहात उघड झाला. 50 ते 60 लोकांनी मटन,चिकन, खेकडे वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांचा चवीने आस्वाद घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दिवशी जिल्ह्यात केवळ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आल्या होत्या. त्यामुळे हा बेत नेमका कुणासाठी याचे कुतूहल अजूनही कायम आहे. बालविकास मंत्र्यांनी विश्रामगृहात भोजन न करता एका कार्यकर्त्याच्या घरी भोजन केल्याचे सांगितले जाते. हे मान्य केले तर मग एवढा खटाटोप नेमका कोणासाठी हाही प्रश्नच आहे. मंत्रीमहोदयांनी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र ती अत्यंत साधी भाकर आणि वांग्याचे भरीत अशी होती असे स्पष्टीकरण महिला व बाल कल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिले. त्यामुळे मंत्री महोदय यांनी भोजनाचा आस्वाद घेतला नसल्याचे स्पष्ट असल्याने मग नेमका हा बडेजाव कुणासाठी हाही प्रश्नच पडतो. सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जर या मेजवानीवर ताव मारला असेल तर हेही परिस्थितीला धरून नाही.

आज जिल्ह्यात जी घटना घडली त्याने अख्खा देश हळहळला. अनेक कुटुंबांना आपल्या  लेकरांना गमवावे लागले. कदाचित या कुटुंबांच्या घरात मागील दोन-तीन दिवसांपासून चूलही पेटली नसेल. मग अशावेळी दौऱ्याच्या निमित्ताने किंवा अन्य कारणाने आणि तेही शासकीय विश्रामगृहात मांसाहारी भोजनाचा बेत आपला जात असेल तर नक्कीच हे माणुसकीला शोभणारे नाही. खाणारे कोण आणि नियोजन करणारे कोण यापेक्षाही ही परिस्थिती काय याचे भान सगळ्यांनाच ठेवायला हवे. नाहीतर आरोग्य पर्यटन म्हणून अशा गोष्टींकडे भविष्यात पाहिले जाईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंत्री झाले आता अधिकाऱ्यांची वर्दळ!
आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ भंडाऱ्यात

भंडारा: दहा चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर राज्यातील नऊ मंत्रीमंडळात घेऊन गेले. आता मंत्र्यांचे येणे थांबले असताना आज राज्यातले आरोग्य विभागाशी संबंधित सर्व शिरसस्त अधिकारी आज जिल्ह्यात दाखल झाले होते. संपूर्ण दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशीच्या फेऱ्यात घेत अनेकांची मते जाणून घेतली.आता या मंथनातून नेमके काय बाहेर पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
8 जानेवारी च्या मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेली दुर्घटना व्यथित करणारी अशीच होती. दहा चिमुकल्यांचे जीव घेणारा या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून नऊ मंत्री जिल्ह्यात येऊन गेले. चार दिवस त्या घटनेला लोटले मात्र ठोस निष्कर्षापर्यंत कुणीच पोहोचलेले नाही. कुणाच्या चुकीचे भोग या चिमुकल्यांना भोगावा लागला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान मंत्र्यांचे येणे आज थांबल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर व्यास, आयुक्त रामास्वामी, अग्निसुरक्षा उपसंचालक रहांगडाले आणि विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात थांबून वास्तविक त्या जाणून घेतल्याचे समजते. यासोबतच फॉरेन्सिक लॅब चे पथक आणि नागपूरच्या अग्निशमन महाविद्यालयाचे तज्ञ लोकांचे पथक आज जिल्ह्यात होते. या सगळ्यांकडून घटनेचा संपूर्ण लेखाजोखा घेत निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या अधिकार्‍यांसमोर घटनेच्या वेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पेशी झाल्याचेही समजते. त्यामुळे आता या सर्व मंथनातून काय बाहेर येईल आणि कुणाचा दोष सिद्ध होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.