Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज ५६ नवीन कोरोनाबाधित तर २४ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २५ मार्च: जिल्हयात आज ५६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०३२८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९८२८ वर पोहचली. तसेच सद्या ३९१ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.७९ टक्के तर मृत्यू दर १.०६ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 56 बाधितांमध्ये गडचिरोलीतील २६, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड तालुक्यातील ५,  चामोर्शी ४, कोरची तालुक्यातील १, सिरोंचा १,  तर वडसा तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २४ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १२,  अहेरी ७, मुलचेरा १, कुरखेडा २, तर वडसा मधील २ जणांचा समावेश आहे.

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये  रामपुरी वार्ड ३ , जीएनएम वस्तीगृह १, डोंगरमेंढा १, पद्मालय नगर १, कॅम्प एरिया १, हनुमान वार्ड १, त्रिमुती चौक २, इंदाळा १, गणेश नगर १, पटवारी भवन जवळ १, मोरेश्र्वर पेट्रोल पंप जवळ १, जेप्रा १,   बोरगांव १, वंजारी मोहल्ला १, स्थानिक १, रेड्डी गोडावुन चौक १, चुराचुरा १, लिटील फ्लॉवर शाळा ३, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, आलापल्ली 2 , नागेपल्ली 3,  आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक १,  बरडी १, बारकबोडी १, नंदनवन कॉलनी १,  कोरची तालुक्यातील बाधितामध्ये  जांबली १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  हनुमान नगर १, सोनापूर २,  मार्केडा १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये मुलदीमा १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, एलबीपी हेमलकसा ४, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड १, एसआरपीएफ कॅम्प विसोरा ५, हनुमान वार्ड १, तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये २ जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.