Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन कोरोना बाधितांची शतकी पार खेळी तर ३९ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,दि. २ एप्रिल: गडचिरोली जिल्हयात आज १०३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०८०३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०१६२ वर पोहचली. तसेच सद्या ५३० सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १११ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ४.९१ टक्के तर मृत्यू दर १.०३ टक्के झाला.

          नवीन १०३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ५४, अहेरी ११, आरमोरी ११, भामरागड तालुक्यातील ८,  चामोर्शी ६, धानोरा तालुक्यातील ४,  कुरखेडा २,  मुलचेरा २, तर वडसा तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३९ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १६, अहेरी १०, आरमोरी ८, चामोर्शी २, मुलचेरा १, कुरखेडा १,  तर वडसा मधील १ जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये कॅम्प एरिया ६, सर्वोदय वार्ड ८,  नवेगाव ४, रामपुरी वार्ड  कॅम्प एरिया २, मारेगाव २, झेडपी कॉलनी १, मेडिकल कॉलनी ४,  शाहू नगर ४, गुलमोहर कॉलनी २, लांजेडा १, आरमोरी रोड १, गुरुकुंज कॉलनी १, गोगांव १, सोनापूर कॉम्पलेक्स २, एसपी कार्यालय १, जवाहरलाल नेहरु स्कूल ७, गोकुलनगर १,  इंदाळा २, स्थानिक १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  बोरमपल्ली २, नागेपल्ली २, आलापल्ली ३, स्थानिक ४, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये कुरांडीमल २, कालागोटा १, स्थानिक ८, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये अंगारा १, स्थानिक १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये  कालीनगर १, एनएससी हायस्कूल सुंदरनगर १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  ओमनगर १, स्थानिक २, आश्रम स्कूल गुंदापल्ली १, कुनघाडा १, फॉरेस्ट कॉलनी घोट रोड १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प २, मुरुमगांव १, स्थानिक १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ४, एलबीपी  हेमलकसा ४, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये  एकलपूर १, विर्शी २, किदवई वार्ड २, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये ३ जणांचा समावेश आहे.

Comments are closed.