Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यापुढे उद्योगनगरी हे शीर्षक लागणार आहे-उद्योग मंत्री उदय सामंत

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई : पुढील वर्षापर्यंत गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसल्या जाणार असून गडचिरोली जिल्ह्यापुढे उद्योगनगरी हे शीर्षक लागणार आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रकल्पातंर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 35 हजार कोटीची गुंतवणूक 50 हजार कोटी पर्यंत जाणार असून गडचिरोली जिल्हयात 75 हजार कोटीचे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राची औद्योगिक भरारी हा कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर येथे होत आहे.

महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक आणि आर्थिक विकास याची माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे. महायुती सरकारने दावोस येथील आर्थिक विकास परिषदेमध्ये 5 लाख कोटींचे सांमजस्य करार केले असून यातून पाच लाख रोजगार निर्मिती झाली आहे. तसेच महायुती सरकारने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रकल्पांबद्दल श्वेतपत्रिका पत्रिका काढली याला विरोधकांनी सुद्धा विरोध केला. महाराष्ट्रातील महिलांसाठी भूसंपादनाचे नियम शिथिल करण्यात आले असून महिला उद्योजकांना उद्योगासाठी जमीन देण्यासाठी अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत सरकार 46 हजार कोटी रुपये खर्च करत असून हे पैसे थेट आर्थिक प्रवाहात येणार असून त्यांनी सुद्धा लहान मोठे उद्योग निर्माण होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्यासाठी ४००कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात 75 हजार कोटीची थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे हा गुंतवणूकीचा प्रवाह असच सुरू राहणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असून महाराष्ट्राला प्रथम स्थानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात उद्योग भवनाची निर्मिती सुरू करण्याचे काम महायुती सरकारने केलेली आहे उद्योगभवना मधे सर्व विभाग एकत्र काम करणार आहे जेणेकरून सर्व विभागांची परवानगी घेण्यासाठी उद्योजकांना त्रास होणार नाही.

महाराष्ट्र शासन कामगाराची सुरक्षा जपण्याबाबत सुद्धा संवेदनशील आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा संरक्षण सुविधा, विमा सुविधा, आरोग्य सुविधा , सांडपाणी निचरा या सुविधा पुरविण्यावर महाराष्ट्र शासनाचे विशेष लक्ष देणार आहे.
महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमा मधून महाराष्ट्रात उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना व्यावसायिकांना माहिती व्हावी यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याने औद्योगिक क्षेत्रात भरारीने प्रगती केली असून भविष्यात सुद्धा हा विकासाचा आलेख उंचावत राहणार आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र हे प्रथम स्थानी असून 30% गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्र सरकारच्या आकडेवारी नुसार सूक्ष्म लघु आणि मध्यम व्यवसाय नोंदणी मधे सुद्धा महाराष्ट्र हा प्रथम स्थानी आहे. त्याचप्रमाणे इज ऑफ डूइंग बिझनेस मधे सुद्धा उत्तम कामगिरीचा दर्जा महाराष्ट्राला मिळाला आहे. भविष्यात महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान, निर्यात, लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवीन धोरणे राबविली गेल्यामुळे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती मधे वाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी प्रास्ताविकेत दिली. यावेळेला विविध योजनांचे लाभार्थी यांना अनुदानाचे मजुरी पत्र आणि विविध विभागातील नियुक्ती पत्र यावेळेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.