Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Naxal arrest : एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलानी केली अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 18 एप्रिल : गडचिरोली पोलीस दलाने गोपनिय खबरीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गड्डा (जो.) हद्दीतील मौजा हाचचोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गड्डा (जां.) येथील पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस चलच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे साधु ऊर्फ काल्या ऊर्फ संजय नरोटे, वय ३९ वर्षे, रा. झारेवाडा तह. एटापल्ली, जि. गडचिरोली यास अटक केली. तो सन २०१५ पासून गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. दिनांक २८/०३/२०२३ रोजी तो नक्षल दलम सोडून घरूनच नक्षलविरोधी कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलीस पाठीवर अॅम्ब्युरा लावणे, जाळपोळ करणे, पोलीस व निष्पाप नागरीकांना जिवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरुपाचे २३ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२ चकमक, २ पोलीस जवानांसहीत एकुण ८ खुन २ जाळपोळ व १ दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली- २०२०, कांदुर २०२०, टेकामेडा- २०२१, गोरा-२०२१, गुडरवाही अॅम्ब्युरो २०२० या चकमकींमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवायास दिनांक १८/०४/२०१३ रोजी अटक केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे जानेवारी २०१२ ते ज्यतापर्यंत एकूण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता , मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी  सतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसके कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक बाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.