Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप

शेळीपालनये 3५ व कुक्कुटपालनच्या २० प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 19 मे –गडचिरोली जिल्ह्यातील शेतकन्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल सा. यांचे मागदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतीना गडचिरोली पोलीस दल व विओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींना शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम दि. १९/०५/२०२३ रोजी बिओजाय आरसेटी कार्यालयात पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने शेळीपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, भामरागड, जिमलगट्टा, हेडरी, पेंढरी व धानोरा येथील ३५ महिला-पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ३० पुरुष व ०५ महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. दिनांक १०/०५/२०२३ ते १९/०५/२०२३ पर्यंत एकूण १० दिवसाच्या या प्रशिक्षणात तज्ञांच्या मार्फतीने शेळ्यांच्या जाती, चारा व्यवस्थापन व लसीकरण संदर्भात प्रशिक्षण व उद्बोधन करून, शेळीपालन व्यवसाय उभारणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, भामरागड, जिमलगट्टा, हेडरी, पंढरी व धानोरा येथील २० महिला-पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १७ पुरुष व ०३ महिला प्रशिक्षणार्थ्याचा समावेश होता. दिनांक १०/०५/२०२३ ते ११/०५/२०२३ पर्यंत एकूण १० दिवसाच्या प्रशिक्षणात कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शेळी पालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्याना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकन्यांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच बेरोजगार युवक-युवतींना व्युटीपार्लर १७४ मत्स्यपालन ८७, कुक्कुटपालन ५६५, बदक पालन १०० वराहपालन १०. शेळीपालन १४२ शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण २०६२ टू व्हिलर दुरुस्ती १३४, फास्ट फूड १२७, पापड लोणचे १९, फोर व्हिलर वाहन प्रशिक्षण ५९२, एमएससीआयटी २३१, कराटे प्रशिक्षण ४८ व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण ३५ असे एकुण ५११६ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी  धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी संचालक कैलास बोलगमचार, परिक्षक  कुंडलीक काटकर व भूषण मेश्राम, तज्ञ मार्गदर्शक राजेन्द्र वंजारी व सो. हयाली नेताम मॅडम, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर सर्व बीओआय आरसेटी, गडचिरोली हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभाग तसेच पोस्टे / उपपोस्टे / पोमकेंचे सर्व अधिकारी / अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.