Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला

नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

कुरखेडा, 24 सप्टेंबर : नक्षलवादी संघटनेच्या विलय  सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला असून कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाने ही कारवाई केली.

21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. कोरची व टिपागड दलमच्या नक्षलवाद्यांनी मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यावर ‘डीएसएमडी’ उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर एक संशयितस्थळी बीडीडीएस पथकाला पाचारण केले. घटनास्थळी जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थ भरून असलेले ४ पाकीट आढळून आले. त्यात ११.८ किलो स्फोटके होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा ठाण्याचे सहायक निरीक्षक भूषण पवार व जवानांनी ही कारवाई केली. बाबतचा पुढील तपास लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.