Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिसांनी केली 443400/- रुपयाची दारूजप्त

रेपणपल्ली येथे घटना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी 4 फेब्रुवारी :- दि.०३/०२/२०२३ रोजी रेपनपल्ली हद्दीत दारुची अवैध वाहतूक करीत असले बाबतची माहीती मिळाल्याने उप-पोस्टे रेपनपल्ली चे प्रभारी अधिकारी पोउनि गोविंद खटिगं नापोशी / मनोज नैताम, देवव्रत गयाली व पोशी / व्यंकट यादव यांचेसह पोस्टेच्या समोर सापळा रचुन बसले असता, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन क्रं एम. एच. 49 AT / 2704  हिला थांबवुन पाहनी केली असता.

त्यामध्ये 90 मी.ली. मापाच्या रॉकेट संत्रा डिस्टलरी प्रवरानगर देशी दारुचे सिलबंद 100 पेटी कि. 443400/- रु वाहन क्र एम. एच. 33 A / 4453 यामध्ये 500 मी.ली. मापाच्या किंगफीशर स्ट्रॉंग प्रीमीयम बीयर सिलबंद 02 पेटी कि. 9520/- व 750 मी.ली. मापाच्या इम्पेरीअल ब्लु सुपीरीअर ग्रेन व्हिस्की चे सिलबंद 11 पेटी कि. 84480/- असा एकूण 443400/-रु. चा माल अवैधरीत्या विक्री करण्याचा उद्देशाने जवळ बाळगुन वाहतुक करताना मिळून आल्यास, आरोपी नामें कार्तिक बापु दुर्गे वय 28 वर्ष, व्यवसाय – चालक, रा. छल्लेवाडा मु. वार्ड क्र 02 अहेरी यास ताब्यात घेतले व स्कॉरपीओ वाहन चालक नामे- सुजल मंडल वय अंदाजे 40 वर्ष रा. चामोर्शी हा पळुन गेला असुन त्याचेवर म. दा. का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयातील पुढील तपास पोउपनि गोविंद खटिगं करीत आहेत. त्याविरुध्द मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सा. यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे / उप-पोस्टे / पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सा, अपर पोलीस अधिक्षक सा (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, अपर पोलीस अधिक्षक (अहेरी) श्री. यतीश देशमुख सा. च उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  पूर्ण केली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.