Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर दि. १८ एप्रिल: शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्र वानाडोंगरी येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी भेट दिली. रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

रुग्णालयातील कोविडग्रस्त रुग्णांची माहिती यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी पालकमंत्र्यांना दिली. ३५० बेडची क्षमता असलेल्या या रुग्णालयात ३२२ कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १२० रुग्णांना रेमडिसिवरची उपचार सुरु आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेविषयीही माहिती त्यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळच्या कोविड लाटेमध्ये तरुण वयोगटातील मृतांची संख्या जास्त असल्याचे डॉ. गोडे यांनी सांगितले. टास्कफोर्सतर्फे दिलेल्या सर्व सूचनांचे पालन रेमडिसीवीर उपयोग करतांना करण्यात येत आहे. अधिक ऑक्सिजनच्या पुरवठयाची गरज असल्याचे यावेळी पालकमंत्री यांना सांगितले. २२ मार्चपासून आजपर्यंत ६६ मृत्यूची नोंद या रुग्णालयात झाली आहे. अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची मदत घेण्याची सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी रुग्णालय प्रशासनाला केली.

Comments are closed.