Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य हीच संपत्ती,आपले आरोग्य जोपासावेत:- खासदार अशोकजी ‌नेते

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपुर, 30 जुलै : विकासपुरूष, लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे भव्य मोफत रोग निदान,शस्त्रक्रिया,चष्मे वाटप व महाआरोग्य शिबीराचे आयोजीत करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराला खासदार अशोकजी ‌नेते यांनी बोलतांना आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल, जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे लक्ष आपण देत असतो याचा विचार केला पाहिजे. आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे.आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशातच त्यात जाणारा वेळही खूप असतो.यासाठी अशा शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.

पुढे बोलतांना अशोकजी ‌नेते यांनी म्हणाले जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन,जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे व्रत जोपासणारे एकमेव विकासपुरुष, लोकनेते, सुधीरभाऊ मुनगंटीवार च आहेत.त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया,चष्मे वाटप व महाआरोग्य शिबिर अतिशय चांगला, कौतुकास्पद, स्तुतीमय कार्यक्रम आयोजित केला.अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनतेचा आशीर्वाद सुद्धा मिळतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोग्य हीच संपत्ती आहे,आपले आरोग्य जोपासावेत आरोग्यम् धनसंपदा,जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.जनतेचे आरोग्य लक्षात घेत महा आरोग्य शिबिर राबविण्यात आले त्यामुळे आजचा वाढदिवस आनंददायी, आरोग्यदायी, आशीर्वाद रूपाने साजरा झाला. याकरिता मी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनापासून हृदयातून, अंतकरणातून, मनःपूर्वक उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांचे जीवन सुख समृद्ध,आरोग्यदायी, आनंदमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी आरोग्य शिबिर या कार्यक्रमा प्रसंगी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मंचावर खासदार रामदास तडस वर्धा लोकसभा क्षेत्र, खासदार सुनिल जी मेंढे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र डॉक्टर अभ्युदय मेघे,अनिल जी गुप्ता, कार्यक्रमाचे आयोजक देवरावजी भोंगडे, जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलीस अधिक्षक परदेशी साहेब, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,डॉ. गहलोतजी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,संजय जी कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, शिबिराला आरोग्य स्टाफ कर्मचारीवर्ग, शिबिराचा लाभ घेणारे नागरिक,जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.