Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभुमीवर होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. २४ मार्च: राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड- १९) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा (कोविड- १९) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्हयातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. कोविड-१९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, नागरिकांनी पालन करावयाचे आवश्यक ती मानद कार्यप्रणालीनुसार पुणे जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदर मनाई आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा- २००५ व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.