Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फेब्रुवारीत बसणार उन्हाचे चटके, हवामान विभागाने दिला इशारा

मुंबईत 7.6 अंशांनी तापमान वाढले आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

Weather Update मुंबई 20 फेब्रुवारी :-  महाराष्ट्रासह देशात उष्णतेची लाट आली आहे. फेब्रुवारी महिन्यात आल्हाददायक वातावरणाऐवजी अधिक उष्णता जाणवत आहे. त्यामुळे फेब्रुवारी असूनही उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली आहे. यातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंशांवर पोहचले आहे. अशात पुढील आठवडाभर कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस उष्णतेमुळे अधिक त्रास होणार आहे.

पुढील पाच दिवस मुंबईत आकाश निरभ्र राहिल. त्यामुळे सूर्याची किरणे अधिक तापदायक ठरू शकतात. शनिवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३७.९ अंश, रत्नागिरी ३८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी यात किंचतशी घट झाली होती. तर, मुंबईत कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भाचा पण पार वाढलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समुद्रातील वार्‍यांचा वेग मंदावल्याने मुंबईतील कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना आता तीव्र उन्हाच्या छळा सहन कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रातील इतर राज्यांनाही उन्हाच्या तीव्र छळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता फेब्रुवारीतच हाय गर्मी म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांतून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. मुंबईत 7.6 अंशांनी तापमान वाढले आहे.

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.