Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बच्चू कडू सारखे मंत्री असतील तर भारतात गरीबाच्या डोळ्यात अश्रू राहणार नाहीत

वीरमाता अनुराधा गोरे व राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 14 जानेवारी :- मुलगा कॅप्टन विनायक गोरे 1995 रोजी भारताचे रक्षण करत कुपवार बार्डर(ऑपरेशन रक्षक) वर शाहिद झाला, या मातेने हे दुःख पचवून विनायक सारखे अनेक तरुण घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले, अनेक पुस्तके लिहिली, शाळा महाविद्यालयात जाऊन तरुणांना सैन्यात जाण्यासाठी प्रोसाहित केले, या वीरमातेस मात्र सरकारी दरबारी फेऱ्या मारून शाहिद सैनिकांना मिळणाऱ्या सवलती व भूखंडासाठी झटावे लागत आहे, याची खबर मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना मिळाली व त्यांनी तात्काळ मुंबईचे काम पाहणारे ऍड अजय तापकीर, महेश दाभोलकर यांना गाडी येऊन अनुराधा ताई यांच्या घरी पाठवले व मंत्रालय मधे भेटीस बोलावले, मुंबई महानगर पालिकेत सैनिक परिवारास मालमत्ता कर माफ, तसेच मुंबई मधे राहणाऱ्या शाहिद परिवारास मुंबई जवळील परिसरात भूखंड दिला जावा याचा पाठपुरावा सरकार दरबारी स्वतः करणार याचे आश्वासन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बच्चू कडू यांनी एका फोन मॅसेज वर दाखवलेली तत्परता पाहून वीरमाता अनुराधा ताई यांनी बच्चूभाऊ यांना शुभेच्छा देताना म्हणाल्या “भारतातील सर्व मंत्री तुमच्या सारखे झाले तर गरीबाच्या डोळ्यात अश्रू राहणार नाहीत व भारत एक महान देश नक्की होईल” बच्चूभाऊ यांनी शुभेच्छा स्वीकारत म्हंटले “देशासाठी शाहिद झालेल्या मुलाच्या विरमातांचे आशीर्वाद कायम राहु द्या, तुमचा बच्चू कडू देश सेवेत कुठेही कमी पडणार नाही”.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.