Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिर्डी, पंढरपूरला दर्शनाला जात असाल तरअत्यंत महत्वाचा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय संस्थानांनी घेतला आहे. साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शिर्डी साईबाबांच दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पंढरपूर  विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पास सक्ती नाही.

शिर्डीत गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसंच सुट्ट्या आणि सणांच्या दिवशी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या दिवशी केवळ ऑनलाईन पासेस असलेल्यांनाच साईदर्शन दिलं जाणार आहे. शिर्डीतील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समिती घेतला आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिर्डीत गुरुवार,शनिवार आणि रविवारी दिवस फक्त ऑनलाईन पास धारकांना दर्शन देण्यात आले येणार आहे. . तसेच दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेण्यात आला आगे. गर्दी नियंत्रणासाठी ३ दिवस पास वितरण केंद्र बंद ठेवणार.

तसेच पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पासकरता सक्ती नाही. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आता दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

( हे पण वाचा :बॅडमिंटनपटू सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह)

Comments are closed.