Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यूसह 44 कोरोनामुक्त तर 26 नव्याने पॉझिटिव्ह

  • आतापर्यंत 22,334 बाधित झाले बरे
  • उपचार घेत असलेले बाधित 418

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 1 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 26 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 334 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 549 झाली आहे. सध्या 418 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 76 हजार 238 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 49 हजार 988 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी शहरातील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 367 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 334, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 26 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका एक, भद्रावती दोन, ब्रम्हपुरी दोन, सिंदेवाही एक, मुल एक, गोंडपिपरी दोन, राजुरा तीन, वरोरा दोन व कोरपना येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Comments are closed.