Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु

प्रशासनाकडून स्टेज ३ नुसार अनलॉकबाबत नवीन आदेश जारी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ६ जून :  शासन निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग संदर्भाने “ब्रेक द चैन अंतर्गत निर्धारित प्रतिबंधात्मक पातळी” अंतर्गत गडचिरोली जिल्हा हा पातळी-3 मध्ये मोडत असून शासन आदेशानुसार वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना कालावधी, सोमवार दि. 07 जुन 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात येणार आहेत.

त्याअनुषंगाने शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने ही सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

 अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने ही सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 रेस्टॉरेन्ट, उपहारगृह- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि इतर वेळेस पार्सल/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.

 सार्वजनिक स्थळे, खुले मैदान इ.- सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत सुरु असेल.

 खाजगी कार्यालये हे  सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

 खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती- 50% उपस्थितीसह सुरु ठेवता येईल. याहून अधिक उपस्थिती गरजेचे असेल तर संबंधित विभाग प्रमुखाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची पूर्वपरवानगी घ्यावी.

 क्रीडा- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 5 ते  9 वाजेपर्यंत तर सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आऊटडोअर क्रीडा विषयक बाबी सुरू ठेवण्याची मुभा असेल.

 सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन इ. ठिकाणची गर्दीबाबत- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

 विवाह कार्यक्रम- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

 अंत्यविधी- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

 स्था.स्व.संस्था व सहकारी संस्था यांचे बैठका व निवडणुकाबाबत- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

 बांधकाम-सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल परंतु कामगारांना दुपारी 4 वाजेनंतर काम करण्याची परवानगी नसेल.

 कृषी विषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सुरू ठेवण्याची मुभा असेल.

 ई-कॉमर्स साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरु असतील.

जमावबंदी/संचारबंदी-सायंकाळी 5.00 ते  सकाळी 7.00 वाजेपर्यंत एकत्रितरित्या 5 हून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल.

 व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ.- सकाळी 7.00 ते  दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.

 सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- 100 टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येणार तथापि सदर वाहनांमध्ये आसनव्यवस्थे व्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल.

 आंतरजिल्हा वाहतूक नियमितपणे सुरु राहिल. तथापि दिनांक 04.06.2021 चे शासन आदेशानुसार निर्धारित पातळी-5 (Level-5) मधील जिल्ह्यात अतितातडीच्या कारणाकरिता ई-पास आवश्यक असेल.

 तसेच आंतरराज्य वाहतुकीसंदर्भात शासनातर्फे वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.

 उत्पादनसेवा-MSME- नियमितपणे सुरु असतील. उत्पादन सेवा

1.अत्यावशक सेवासंबंधी, 2. प्रोसेसिंग सेवासंबंधी, 3. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी, 4. डाटा सेंटर्स/क्लाऊड सर्विस प्रोवायडर/क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेवासंबंधी आयटी क्षेत्र- नियमितपणे सुरु असतील. उत्पादन सेवा (वरील मुददा क्र. 23 व 24 वगळून इतर सर्व प्रकारचे वैध)- नियमितपणे सुरु असतील तथापि 50% कर्मचाऱ्यांचे वाहूतकीस मुभा असेल.

 वरील विवरणपत्रातील ज्या-ज्या बाबींना दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असेल त्या ठिकाणांमधील व्यक्तींना-कामगारांना सायं. 5 पर्यंत स्वत:च्या घरी पोहाचणे गरजेचे असेल.

 कोविड-19 साथरोगसंदर्भाने कार्यरत कार्यालये, आरोग्य विभाग इ. 100 टक्के कार्यक्षमतेने कार्यरत राहील.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज २ मृत्यूसह 104 कोरोनामुक्त, तर 44 नवीन कोरोना बाधित

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन

स्पुतनिक लसीच्या साठा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार : राजेश टोपे

 

Comments are closed.