Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात विद्यापरीषदेच्या निवडणुकीकरीता शाखानिहाय आरक्षण सोडत जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि. २०:-  विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार प्रत्येक विद्याशाखेचे विद्या परिषदेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्याशाखानिहाय आरक्षण सोडतीची बैठक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव (प्र) तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. अनिल झेड. चिताडे उपस्थित होते.

विद्यापीठातील प्रत्येक विद्याशाखा ही जातीसंवर्ग आरक्षीत करावयाची असून एकूण आठ जागांपैकी एका विद्याशाखेची एक जागा महिलेसाठी आरक्षित करायची होती. तसेच विद्याशाखानिहाय ०२ अध्यापक निवडून द्यायचे होते. त्यानुसार ही आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे निश्चित केली गेली.
त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान -खुला प्रवर्ग, वाणिज्य आणि व्यवस्थापन-खुला प्रवर्ग, मानव विज्ञान विद्याशाखा- खुला प्रवर्ग, आंतरविद्या शाखीय अभ्यास- खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव, विज्ञान आणि तंत्रज्ञान- इतर मागासवर्गीय प्रवर्ग ,वाणिज्य आणि व्यवस्थापन – अनुसूचित जमाती , मानव विज्ञान विद्याशाखा -निरधी सूचित जमाती (विमुक्त जाती)/ भटक्या जमाती, आंतरविद्याशाखीय अभ्यास- अनुसूचित जाती याप्रमाणे आरक्षण सोडत कुलसचिव (प्र) तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. अनिल चिताडे यांनी जाहीर केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- नागपुरातील मान सुन्न करणारी घटना….
आथिर्क तंगी ठरली जीवघेणी https://youtube.com/watch?v=Rrp2jsJDuWo&feature=share

Comments are closed.