Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मजूरांना नियमित रोजगारासाठी मनरेगाची कामे वाढवा

भद्रावती तालुक्यात जिल्हाधिकऱ्यांनी केली मनरेगा कामाची पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, 26 मे –मजुरांना मनरेगा कामाच्या माध्यमातून नियमितपणे रोजगार प्राप्त होण्यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेऊन मजुर उपस्थिती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी यांनी आज भद्रावती तालुक्यातील मुधोली, कोंढेगाव व टेकाडी येथे मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. त्यांनी मजुरांशी संवाद साधला व मनरेगाच्या कामाची माहिती तसेच मजुरांच्या समस्या जाणुन घेतल्या.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, कृषी अधिकारी सुशांत गादेवार, शंकर भांदक्कर, श्री. चौले, जयंत टेंभुरकर, विक्रांत जोशी, सुरज खोडे, अतुल खंडाळे, सुनिल पारोधी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.