Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकसंख्येत जगात भारत नंबर वन

सर्वाधिक लोकसंख्येत भारताने चीनला कसे मागे टाकले, जाणून घेऊया...

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नवी दिल्ली, 19 एप्रिल : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन  नसून आपला भारत  देश आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या डेटामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये असे दिसून येते की भारताने चीनला मागे टाकून 142.86 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. UNFPA नुसार चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. UNFPA च्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023’ हा अहवाल प्रसिद्ध केला. 

अहवालातील वैशिष्ट्ये

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • भारताचा प्रजनन दर सरासरी २.० आहे. सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे.
  • २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आर्युमान ६९ वय होतं.
  • भारतीय लोकसंख्येत ६८ टक्के लोक १५ ते ६४ वयोगटातील
  • २० कोटींहून अधिक लोकसंख्या १५ ते २४ या तरुण वयोगटातील

चीन देश लोकसंख्येच्याबाबतीत जगभरात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, गेल्यावर्षी चीनची लोकसंख्या पहिल्यांदा घसरली. तसेच यंदाही लोकसंख्येत घसरण झालेली आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १४४.८५ कोटी होती. तर आता चीनमध्ये १४२.५७ लोकसंख्या आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.