Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतात आज दिसेल या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई,  25 ऑक्टोबर :-  वर्षातील दुसरे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे आज 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु ग्रहणाचा सुतक कालावधी काल रात्रीपासूनच सुरू झाला आहे. म्हणजेच सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू झाला आहे. सूर्यग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध असेल. यामुळे ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक मान्यता पाळल्या जातील. मंगळवारी 11 वाजून 28 मिनिटापासून सूर्यग्रहण सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटापर्यंत राहील. पाण भारतात हे सूर्यग्रहण 4 वाजून 22 मिनिटापासून दिसायला सुरूवात होइल आणि 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहीत. भारतात, ग्रहणाचा मोक्ष काळ सुर्यास्तानंतरच होईल. ग्रहणात 36.93 टक्के चंद्राने सूर्याचा भाग झाकलेला असेल.

तुळ राशीत सूर्यग्रहण होत आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्योतिषांच्या मते, दिवाळीच्या दुसर्या दिवशी तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यासोबत शुक्र, केतू आणि चंद्रही तूळ राशीत असतील. यासोबतच बुध, शनी, शुक्र आणि गुरू हे ग्रह आपापल्या राशी मध्ये उपस्थित राहतील. बुध कन्या राशीत, शनी मकर राशीत, शुक तूळ राशीत आणि गुरू मीन राशीत असले.

भारतातील सूर्यग्रहणची वेळ

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सूर्यग्रहण – 25 ऑक्टोबर 2022
सूर्यग्रहणाची वेळ – 04 वाजून 22 मिनिटे ते 05 वाजून 45 मिनिट
सूर्यग्रहणाचा कालावधी – 1 तास 21 मिनिट

26 ऑक्टोबर रोजी होईल गोवर्धन पूजा

गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसर्या दिवशी केली जाते. पण सूर्यग्रहणामुळे गोवधर्न पूजा 25 ऐवजी 26 ऑक्टोबरला करता येईल. सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला होते. 25 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण आहे आणि भारतात दिसणारे पहिले सूर्यग्रहण असेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी झाले. परंतु ते भारतात दिसले नाही. सुर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी धार्मिक दृष्टिकोनातून ही त्याला विशेष महत्व आहे.

गर्भवती महिलांनी अशी घ्यावी काळजी

शास्त्रानुसार सुतक काळात आणि ग्रहण काळात गर्भवती महिलांनी स्वतची विशेष काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात कुश आणि गंगाजल सोबत ठेवावे. तसेच शिजवलल्या अन्नमध्ये स्वच्छ कुश घालावे. त्याचवेळी, लहान मुले, वृध्द आणि रूग्ण वगळता कोणीही अन्न खाउ नये, ग्रहण काळात मंदिराचे दरवाजे बंद करून भाविकांनी मानसिक नामस्मरण करावे. ग्रहण संपल्यानंतर तांब्याचे भांडे, अन्नधान्य लालवस्त्र, मसूर, लाल फळे इत्यादी वस्तूदान कराव्यात

देशाच्या या भागांमध्ये दिसणार सूर्यग्रहण

मंगळवार 25 ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिशा, बंगाल, मुंबई, बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर आसाम, नागालॅंड, मणिपूर, अरूणाचल प्रदेशमध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही. शास़्ांच्या मते, पृथ्वी चंद्रासह सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एक सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते आणि ही एक महत्वाची खगोलीय घटना आहे. या सूर्यग्रहणानंतर 2030 मध्ये सूर्यग्रहण होईल, जे केवल 6 टक्के क्षेत्रातच दिसेल. संपूर्ण सूर्यग्रहण पाहण्यासाठी देशवासीयांना 2034 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सनग्लासेस लावून सूर्यग्रहण पाहू न का

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी, सामान्य फिल्टर आणि सनग्लासेस ने पाहु नका. पाण्यात आणि रंगीत पाण्यात त्याची सावली पाहण्याचा प्रयत्न देखील करू नका. सूर्यग्रहण फक्त प्रमाणित सौर फिल्टरनेच पाहा. भिंतीवर पिनहोल कॅमेरा बनवून सूर्याची प्रतिमा सुरक्षितपणे पाहता येउ शकते. कागदाने लहान आरसा झाकून त्यात छिद्र करा. छिद्राची रूंदी 1 जे 2 सेमी असावी. त्याच्या मदतीने भिंतीवर सूर्याचे प्रतिबिंब पाहता येईल.

हे पण वाचा :-

Comments are closed.