Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलींच्या वस्तीगृहात कायदेविषयक शिबिर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 10 ऑक्टोंबर : स्थानिक शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहात अहेरी तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीं व महिलांचे अधिकार या विषयावर समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वर्ग एक र.ना . बावणकर यांच्या मार्गदर्शनात नुकताच घेण्यात आला.
यावेळी तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष एड. मेंगनवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर मुलींना माहिती दिली. एड. बंडू आत्राम यांनी पीडित व्यक्तीवरील विधी सेवा समितीतर्फे राबवीन्यात येणाऱ्या योजनांबाबत मुलींना कायदेविषयक माहिती देऊन जागृत केले.एड. सौ एस. एस. जैनवार यांनी मुलींच्या महत्त्वाच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले. वैशाली देशपांडे यांनीही बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 ची माहिती यावेळी दिली.

शिबिराला वस्तूगृहाच्या मुलींनी उपस्थिती दर्शवून शिबिराचा योग्य लाभ घेतला. कार्यक्रमाची प्रस्तावना वस्तीगृहाच्या प्रभारी गृहपाल कुमारी लता बारस्कर यांनी केली तर शिबिराचे संचालन वरिष्ठ लिपिक एस आर पाचभाई आणि आभार भूषण पायचोड यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.