Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात ‘अष्टपैलू बाबासाहेब ‘या विषयावर व्याख्यान

आधुनिक भारताच्या विकासाचे श्रेय डॉ. बाबासाहेबांना- राहुल पांडे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 15 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आधुनिक भारताच्या निर्मितीचे आहे. परंतू त्यांना विशिष्ट जातीपूर्तीच मर्यादित ठेवण्यात आलेले आहे. त्यांना दलित, शोषितांचे कैवारी म्हणत असतांना , ते फक्त तेवढ्यापूरतीच मर्यादित नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे योगदान हे भारतातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाज घटकांसाठी राहिलेले आहे. त्यांच्या कार्यामागे एकच महत्वाचा उद्देश राहिलेला आहे . तो म्हणजे देशातील जाती व्यवस्था संपुष्टात आणणे . कारण जाती व्यवस्थाच या देशातील सर्व समस्यांची जननी आहे.आधुनिक भारताच्या विकासाचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते बाबासाहेबांना आहे. असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त , नागपूर आणि औंरगाबाद खंडपीठ राहुल पांडे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य आंबेडकर विचारधारा केंद्रातर्फे आज कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून राज्य माहिती आयुक्त नागपूर व औरंगाबाद खंडपीठ राहुल पांडे यांचे “अष्टपैलु बाबासाहेब” या विषयावर व्याख्यान पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. आंबेडकरांची पत्रकारिता, सत्याग्रही आंबेडकर, स्त्रीमुक्तीचे पुरस्कर्ते, शेतकरी स्नेही या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर पैलूंवर ही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी लघुलेखक प्रशांत पुनवटकर यांनी स्वतः लिहिलेले भीम गीत यावेळी सादर केले. सदर कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची विशेष उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले की, सगळ्या समाजाने हा विचार केला पाहिजे की संविधानाने दिलेल्या अधिकाराची जाणीव आपण इतरांना करून दिली पाहिजे. इंग्रजांनी भारतावर राज्य केले असले तरी पुढच्या ५० वर्षात भारताचा नागरिक इंग्लंडचा पंतप्रधान होईल. सगळ्या जगावर भारतीय तरुणांचं राज्य राहील . बाबासाहेबांचे योगदान हे चिरकालीन आहे.

आपल्या प्रास्ताविकात कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन म्हणाले की बाबासाहेब हे कुठल्या एका समाजापुरते मर्यादित नाही तर ते संपूर्ण देशाचे आहे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनेक पैलू आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समन्वयक प्रा.डॉ. नंदकिशोर मने त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. संचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी तर आभार आंबेडकर विचारधरा केंद्राच्या प्रमुख डॉ. प्रीती काळे यांनी मानले. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी ,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.