Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबटाचा हल्ला, शेतकरी महिला व लहान बाळ गंभीर जखमी

उपचाराकरिता अहेरी रुग्णालयात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, 23 ऑक्टोबर :- अहेरी तालुक्यातील कोलपल्ली वन्यप्राण्यांकडुन होणारे मानवी हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात वन्यजीवन व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.  देवलमरी कोलपल्ली परिसरातील दोघांवर बिबट्या हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

देवलमरी जवळ असलेल्या कोलपल्ली येथील मयनाबाई शामराव सडमेक वय ४५ वर्ष ही शेतात काम करताना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्यात महिला व बाळ गंभीर जखमी झाले आहेत. ही नेहमी प्रमाणे शेतात गेले होती कामं करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

राजे अम्ब्रिशराव महाराज यांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली, भामरागडला आर्थीक मदत 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

इस्त्रोच्या राॅकेट LVM-3 चे यशस्वी प्रक्षेपण

Comments are closed.