Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांचे आमरण उपोषण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोडविले

समिती मार्फत कोरडवाहू भागाचा सर्वेक्षण करणार – राज्यमंत्री बच्चू कडू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ७ एप्रिल: अमरावती जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून काही गावातील कोरडवाहू भाग सुटला, काही गावात पाणीच पोहचले नाही. अश्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी लढा संघटनेच्या माध्यमातून अनेक निवेदने दिली परंतु त्यावर संबंधित विभाग लक्ष देत नव्हता त्याचमुळे दि ५ एप्रिल ला आमरण उपोषणा चा पवित्रा उचलला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपोषणाला संजय देशमुख, मुरली मदनकर सह अनेक शेतकरी बसले होते. या उपोषण मंडपाला या भागातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या त्याच बरोबर शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते विजू विल्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी भेटी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या मागणी संदर्भात लढा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भेटी घेतल्या. उपोषणाला बसणार असल्याची देखील माहिती दिली होती त्याच अनुषंगाने राज्य मंत्री बच्चू कडू यांनी या उपोषणाची माहिती घेऊन उपोषण कर्त्यांची फोन वरून विचारपूस केली. सदर मागणी संदर्भात एक समिती स्थापन करून निपक्ष सर्वेक्षण करण्यात येईल असे सांगितले.  

आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण कर्त्याना लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले.

यावेळी गौरी संजय देशमुख, योगेश लोखंडे, निलेश राऊत, शरद खारोडे, सरपंच सुरेन्द्र भिवगडे, हेमंत बोबडे, वैभव खराटे, प्रवीण रहाटे, कुणाल गहुकर, संदीप राघोर्ते, समीर लांडगे, मंगेश ठाकूर, अंकुश गायकवाड, अमोल देशमुख, रवी पाथरे, आदित्य ठाकरे, कपिल उमप, मंगेश इंगळे, सदानंद आखरे, जयंत निखाडे, मनोज लांजेवार, मोहन आवारे, विजय डोंगरे, धीरज वेरुळकर, भीमराव गवळी, नारायण उमक, अमोल साबळे, राजेंद्र चौधरी, बाबाराव इंगोले, दत्ता धस्कट, सरपंच भूषण गाठे, वैभव निभोरकर, निखिल काकडे, मनोहर साबळे, गणेश साबळे, श्रीधर इंगोले यांची उपस्थिती होती.   

Comments are closed.