Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सत्य, एकता आणि शांततेला दिले अधिक महत्व – डॉ. श्याम खंडारे

पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 14 नोव्हेंबर :-  पंडित नेहरुंना लहान मुलांचा अतिशय लळा होता. यामुळेच त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरा केली जाते. त्यांनी सत्य, एकता आणि शांततेला अधिक महत्व दिले असे म्हणत संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. श्याम खंडारे यांनी भारत देशासाठी त्यांचे असलेले महत्त्व विषद केले.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. संचालक रा से यो गोंडवाना विद्यापीठ डॉ.श्याम खंडारे, रासेयो विभागीय वर्धा जिल्हा रा तू म नागपूर विद्यापीठ नागपूर डॉ. आर.डी.निखाडे, डॉ. डी .शेंडे नागपूर, डॉ वाघ, जे. एस .पी. एम. महाविद्यालय, धानोरा हे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.