Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात १६ तारखेला 50 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोना लस देणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ११ जानेवारी: देशात 16 जानेवारी पासून कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत असून राज्यात 511 केंद्रावर लसीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकाना लस दिली जाणार असून लस घेणे ऐच्छिक असल्याने काही जण लसीकरण करून घेण्यासाठी नकार देऊ शकतात,परंतू आरोग्य सेवकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे जेणेकरून सर्वसामान्यांच्या मनातील भीती दूर होईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 16 तारखेला म्हणजे पहिल्याच दिवशी 50,000 लोकांना कोरोना लस देणार असल्याचे ते म्हणाले,सर्व जिल्हा रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयात 16 जानेवारी रोजी लास देण्यात सुरवात होणार असून पहिल्या टप्प्यात 8 लाख कर्मचाऱ्यांना दिली जाणार असून त्यासाठी 2 आणि 8 जानेवारीला लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती,एकंदर प्रशासन लसीकरणासाठी सज्ज झाले असून आता वाट बघायची ती 16 जनेवारीची.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.