Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूविक्री थांबवण्यासाठी मादक द्रव्य समिती करणार प्रयत्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 29 ऑगस्ट : कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे ग्रामसभेत सरपंच कुंतीताई हुपुंडी याच्या अध्यक्षतेखाली मादक द्रव्य नियंत्रन समीतीची निवड करण्यात आली. युवकांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या मदतीने ही समिती अवैध दारूविक्री थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

गावात २०१७ मध्ये अवैध दारु विक्री बंदीचा ठराव झाला. ग्रापं समीती व गाव संघटना गठीत करून महिला ग्रामपंचायत समीती पदाधिकारी, तंटामुक्त समीती अध्यक्ष यांच्या माध्यमातून गावातील दारु विक्री बंद करण्यासाठी लाखोंचा  सडवा, दारू, प्लास्टीक ड्रम व साहित्यांची होळी केली. त्यामुळे दारु विक्रीत्यांचे धाबे दणाणले होते. परंतु पुन्हा मुजोर विक्रेत्यांनी दारू विक्रीला सुरवात केली. ग्रामपंचायत अंतर्गत बेतकाठी व  टेकाबेदळ या दोन्ही गावात अवैध दारूविक्री होय असून युवक दारुच्या आहारी गेले. भांडण तंटे या समस्या लक्षात घेता नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत मादक द्रव्य नियंत्रण समीती स्थापन करण्यात आली. अध्यक्षपदी अमोल निकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या समितीच्या माध्यमातून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यावेळी उपसरपंच हिमेन्द्र कावडे , ग्रापं सदस्य सुरेश काटेंगे, लता नैताम, झेलीया, तमुस अध्यक्ष तिलक सोनवानी, ग्रामसेवक देवानंद भोयर,  माजी सरपंच तथा गाव संघटना अध्यक्ष जयश्री ढवडे, मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके व तालुका प्रेरक विनोद टेभुर्णे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-  

Comments are closed.