३ कोटीचा बँक घोटाळ्यातील आरोपी निखिल घाटेला एलसीबीच्या पथकाने केले गजाआड
वर्धा – नागपुर मार्गावर आरोपीला पकडण्यात एलसीबी पथकाला मिळाले यश.
चंद्रपूर, दि. २ मार्च: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या चंद्रपूर शाखेतिल जवळपास ३ कोटी ५४ लाख रुपये हडपल्याप्रकरणी बँकेच्या निलंबित रोखपाल निखिल घाटे याने कोट्यवधी रुपयांचा अफरातफर केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार बैंके कडून देण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु होता. आज अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने वर्धा – नागपुर मार्गावर नागपुर कड़े जात असतांना खापरी नाकयावर अटक केले.
सद्या ही पैशयाची अफरातफर ३ कोटी ४५ लाखाची आहे. मात्र आता अटक केल्या नंतर पोलिस तपासात आंकड़ा वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. आमच्या कडून कसुन चौकशी सुरु आहे.
Comments are closed.