Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रम्हपुरी 17 ऑगस्ट :-  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. यामध्ये दुधवाही येथील घटनेत एका शेतक-याचा मृत्यू झाला तर पकद्मापूर येथील घटनेत एक गुराखी जखमी झाला आहे. मुखरू राऊत (वय 62) रा. दूधवाही असे मृत शेतकऱ्यांचे नाव असून प्रभाकर धोंडू मडावी रा. पद्मापूर असे जखमी शेतक-याचे नाव आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील दुधवाही येथील शेतकरी मुखरू राऊत (वय 62) हे स्वत: च्या शेतावर धान पिकाची लागवड केली असल्याने नेहमीप्रमाणे आज मंगळवारी सकाळी शेतावर गेले होते, शेतावर धानपिकाची पहाणी करीत असताना शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतक-यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. लगेच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. ही घटना ताजी असतानाच ब्रह्मपुरी तालुक्यातीलच पद्मापूर येथे वाघाने गुराख्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.

पद्मापूर येथील गुराखी प्रभाकर धोंडू मडावी हा गावापासून एक किलोमीटर अंतरावर जनावरे चरण्याकरीता जंगलात गेला होता. जंगलात जनावरे चरत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर अचानक हल्ला चढविला. गुराख्याने प्रचंड आरडा ओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र प्रभाकर धोंडू मडावी हा गंभीर ‘जखमी झाला, त्याला तत्काळ ब्रम्हपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.. त्यानंतर विभागीय वन अधिकारी दिपेश मल्होत्रा यांनी बैठक घेऊन वाढत्या मानव वन्यप्राणी संघर्षाबाबत चिंता दर्शवित वाघाच्या बंदोबस्ता करिता ठोस पाऊले वनविभागाने उचलावी असे निर्देश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

Maharashtra Assembly Session Live –

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=391668493061366&id=107306221170364

Comments are closed.