Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलातर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमाचे आयोजन

बाईक रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 300 अंमलदारांचा सहभाग

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 1 ऑक्टोंबर:-   स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमाचे व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर स्वच्छता उपक्रम हे मा. पोलीस अधीक्षक कार्यालय, शौर्यस्थळ, पोलीस संकुल परिसर, पोलीस कॅन्टीन, सीआरपीएफ परिसर, पोलीस मुख्यालय परिसरातील जेटीएससी, एकलव्य हॉल, पोलीस कवायत मैदान, शहिद पांडू आलाम सभागृह इ. परिसरात तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें परिसरात साफसफाई करुन राबविण्यात आले. यामध्ये मा. वरिष्ठ अधिका­यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन पोलीस अंमलदारांसोबत मिळुन पोलीस मुख्यालय परिसरात स्वच्छता केली. तसेच सदर स्वच्छता उपक्रमाचे महत्व गडचिरोली जिल्ह्रातील सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये एकुण 300 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. तसेच जिल्ह्रातील जनसामान्य जनतेने या स्वच्छता उपक्रमात आपला सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रम प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. यांनी स्वच्छतेचे महत्व पटवुन सांगीतले व आपल्या सभोवताल स्वच्छता राखणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे. तसेच आपले शरीर निरोगी राहावे व आपल्या आजुबाजुच्या परिसरात रोगराई निर्माण न होऊ देता प्रत्येकजणांनी आपले घर व घराच्या आजुबाजुचे परिसर दररोज स्वच्छ करावा असे सांगीतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आयोजीत कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री. मयुर भुजबळ हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Comments are closed.