Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हॉटेलची इमारत कोसळून एक ठार तर एक जण गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवड परिसरामध्ये आज दुपारी अचानक जोरदार वादळ आणि पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकता या इमारतीचा मोठा भाग कोसळल्यामुळे एक जण ठार तर एक जण जखमी झाले आहे. प्रशासनाकडून मदत आणि शोधकार्य सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एकता हॉटेल मध्ये धुळे येथील चार जण दुपारच्या सुमारास जेवणासाठी आले असतांना अचानक या हॉटेल ची स्लाब कोसळल्याने एक व्यक्ती ठार तर एक व्यक्ती जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीं कडून सांगण्यात आले. घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीस मालेगाव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोसळलेल्या या स्लॅबखाली अनेक जन दाब्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु दुपारची वेळ असल्याने एवढी गर्दी नव्हती. मात्र अचानक आवाज येऊ लागल्याने दर्शनी भाग कोसळत असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यासह मालक आतील भागात पळून गेले. परिणामी त्यांचे प्राण वाचले आहे. मात्र यात धुळ्याचा

घटनेची माहिती प्राप्त होताच राज्याचे कृषिमंत्री आमदार दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची माहिती घेतली असून पोलीस मालेगाव महानगरपालिका अग्निशामक दल व स्वयंसेवक कोसळलेला ढिगारा हटविणे आणि अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.