Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीसाठी वनविभागामार्फत बाईक रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, 

गडचिरोली, 4 ऑक्टोबर: वन्यजीव सप्ताहानिमित्त दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी गडचिरोली वनविभाग, गडचिरोली व सामाजिक वनिकरण विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये वनपरिक्षेत्र कार्यालय गडचिरोली, वनपरिक्षेत्र कार्यालय पोटेगाव, वनपरिक्षेत्र कार्यालय चातगाव, सामजिक वनिकरण, परिक्षेत्र गडचिरोली व वडसा येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जनजागृती रॅलीचा शुभारंभ गडचिरोली वनविभागाचे उप वनसंरक्षक, मिलिश शर्मा व सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी, गणेशराव झोळे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रॅली वनसंरक्षक कार्यालय येथून इंदिरा गांधी चौक, चामोर्शी रोड मार्गे गोकुळनगर, ITI square वरून स्मृती उद्यान, नवेगाव कॉम्प्लेक्स येथे नेण्यात आली. तेथून परत येऊन रॅलीची सांगता गडचिरोली वनपरिक्षेत्र कार्यालय येथे करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलासाठी केवळ मनुष्यप्राणी जबाबदार आहे. दिवसेंदिवस वनांवरील अतिक्रमण वाढत असून जंगल नाहीसे होत आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच जंगल क्षेत्र कमी झाल्यामुळे वन्यप्राणी जंगलाबाहेर पडून ईतर पाळीव प्राणी तथा मनुष्यावर हल्ला होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामूळे वन्यजीवांचे अधिवास क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी व अन्नसाखळीतील महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वनविभागा मार्फत सदर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा यांनी केले.

या कार्यक्रमासाठी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, पोटेगावचे वन परिक्षेत्र अधिकारी  राहूल तांबरे, अमर भिसे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे धीरज ढेंबरे, प्रादेशिक कार्यालयातील वनपाल  नवघरे, पेंदोरकर, जनबंधू,  वासेकर, मोहूर्ले, दांडेकर, धात्रक व इतर क्षेत्रीय कर्मचारी व RRT टीम उपस्थित होते. सामाजिक वनिकरण परीक्षेत्रातील वनपाल देगावे, गड्डमवार, कु. विद्या उईके तसेच इतर कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनामध्ये गडचिरोली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.